महत्त्वाचे

सध्या माझा ब्लॉग पूर्णपणे तयार नसल्याने बरेच फीचर्स काम करणार नाही. कृपया सहकार्य करावे. - अक्षय बैसाणे

Post Top Ad

Your Ad Spot

visiters

Followers

Friday 24 May 2019

पत्रकारांचा बायोडेटा(RESUME) कसा असावा?

    नमस्कार मित्रांनो!!! मी अक्षय बैसाणे पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलोय एक खास पोस्ट. मित्रांनो शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नोकरीसाठी प्रत्यक्ष मुलाखत (interview) द्यावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का नोकरीसाठी अर्ज करत असताना आपल्या अगोदर आपला बायोडाटा म्हणजेच रेझ्युमे हा आपला प्रतिनिधी किंवा आपले प्रतिबिंब म्हणून संबंधित कंपनीकडे पाठवावा लागतो. आपला रेझ्युमे जेवढा परिपूर्ण असेल तेवढीच नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच रेझ्युमे हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे म्हणतात. तर मी आजच्या या पोस्ट मध्ये रेझ्युमे बद्दल काही टिप्स माझा अनुभवातून देणार आहे. आशा करतो कि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.  तत्पूर्वी तुम्हाला माझा ब्लॉग आवडल्यास मला फॉलो बटणावर क्लिक करून मला फॉलो करा आणि माझ्या ब्लॉग ची लिंक आपल्या फेसबुकव्हाट्सएप्प, इंस्टाग्राम, आणि ट्वीटर वर शेअर करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात पत्रकारांचा बायोडाटा कसा असावा???
     सर्वप्रथम हे जाणून घ्या कि, इतर क्षेत्र आणि पत्रकारिता हे क्षेत्र यात खूप फरक आहे. पत्रकार हा ज्याप्रमाणे परफेक्ट आणि क्रिएटीव्ह असावा लागतो त्याचप्रमाणे त्याचा बायोडाटा तसाच असावा. सर्वसाधारणपणे रेझ्युमे  हा "microsoft word" मध्ये बनवला जातो. इंटरनेटवर रेझ्युमे चे अनेक प्रकार (format) मिळतील पण, कॉमन आणि एकसारख्या शेकडो रेझ्युमे मधून आपला रेझ्युमे  सर्वात आकर्षक आणि परिपूर्ण बनवण्यासाठी आपण जरा वेगळा आणि हटके विचार केला तर?.... मी BMM चा विद्यार्थी आहे आणि यामुळेच मी माझा रेझ्युमे  जरा हटके बनवला आहे. यासाठी मी QuarkXpress या सॉफ्टवेअरचा उपयोग केला तुम्ही photoshop, Corel Draw, अशा अनेक सॉफ्टवेअर्सचा उपयोग करू शकता.
१) रेझ्युमे  शक्यतो एकाच पानाचा असावा.

     मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी शेकडो रेझ्युमे  आलेले असतात. त्यामुळे भले-मोठे रेझ्युमे  वाचण्यासाठी कंटाळा केला जातो अथवा ते नंतर वाचण्यासाठी  बाजूला ठेवले जातात. आणि घाई-गडबडीत नंतर ते वाचलेच न जाण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे रेझ्युमे हा एकाच पानाचा आणि A-4 साईझ चा असावा. जेणेकरून तो बाजूला ठेवला जाणार नाही.

२) रेझ्युमे थोडक्यात पण जास्त माहिती सांगणारा असावा. 

     ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा सारांश लिहितो त्याचप्रमाणे रेझ्युमे असावा. त्यात केवळ महत्त्वाचीच माहिती असावी. जसे तुमचे शिक्षण, कौशल्य, कामाचा अनुभव,ज्ञात भाषा, पत्ता,नाव,जन्मतारीख,फोन नं. इत्यादी.  त्यानंतर तुमची इतर कौशल्ये, कोर्सेस,तांत्रिक ज्ञान, संगणकीय ज्ञान, छंद,आवड  इत्यादींबद्दल उल्लेख असावा. 

३) रेझ्युमे वाचनीय आणि प्रेझेंटेबल असावा.

    रेझ्युमे तयार करत असताना सहज आणि सोपा फॉंन्ट वापरावा आणि फॉंन्टचा आकार १२-१४ दरम्यान असावा. महत्वाच्या गोष्टी ठळक (bold) असाव्यात. गरज असेल तिथे बुलेट, अंडरलाईन यांचा उपयोग करावा. शिक्षणाची माहिती देण्यासाठी तक्त्याचा वापर केल्यास चांगले दिसते. त्याचप्रमाणे कोणती पदवी, कोणत्या वर्षी, कोणत्या विद्यापीठातून घेतली आणि त्यात किती गुण मिळाले याचा उल्लेख करण्यासाठी तक्ता उपयोगी पडतो. शिक्षण लिहित असताना वरच्या क्रमाने सुरुवात करावी. जसे - पदवी, १२ वी, १० वी. तसेच कामाचा अनुभव सांगताना कोणत्या कंपनीत, किती काळ, काय काम केले हे सुद्धा स्पष्ट मांडलेले असावे. तुमच्या रेझ्युमे ची मांडणी जेवढी चांगली असेल तेवढेच तुमचे चांगले इम्प्रेशन मुलाखत घेणाऱ्यावर पडते आणि तुमच्याबद्दल  सकारात्मकता वाढते.

४) तुमचे सोशल मिडिया अकाऊंटस् आणि विविध लिंक्स द्याव्यात.
     पूर्वी संपर्कासाठी केवळ पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला जात असे. पण आताच्या डिजिटल युगात इ-मेल आयडी सुद्धा असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर त्याचाही उल्लेख करावा जेणेकरून तुमचं काम त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळेल.  आताच्या युगात सोशल मिडीयावर  active असणे गरजेचे आहे. विविध विषयांवर तुम्ही कशाप्रकारे व्यक्त होता? तुम्ही कोणत्या पोस्ट जास्त शेयर करतात? तसेच विविध प्रसंगी तुम्ही लिहिलेले लेख, तुम्ही दिलेल्या भेटी इत्यादी सर्वकाही  सोशल मीडियामुळे समजण्यास मदत होते. थोडक्यात त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन प्रोफाईल च्या लिंक्स द्याव्यात. सोबतच व्हाट्सएप्प चा नंबरही द्यावा. परंतु सर्व सोशल मिडिया अकाऊंट शेयर करत असताना खूप काळजी घ्यावी. तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र होणार नाही याची काळजी स्वतःच घ्यावी. उदा. तुमच्या फेसबुक अकाऊंट मध्ये तुमच्या परिवारातील सदस्य, तुमचे मित्र, बॉस अथवा तुमच्या क्षेत्रातील इतर लोक एकत्र असतील तर तुमच्या खाजगी किंवा पारिवारिक  आयुष्यात  नकळत इतर लोक डोकावतात. जे आपल्यासाठी चांगले नाही. समजा तुम्ही बॉसला मी आजारी' असल्यामुळे कामावर येऊ शकत नाही असे खोटे कारण सांगितले आणि काही वेळाने तुमच्या एखाद्या सोशल मिडिया स्टोरी वर तुम्ही कुठेतरी सिनेमा अथवा फिरायला गेला आहात हे दिसते.... तर... विचार करा खाजगी आयुष्य आणि काम हे दोन्ही एकत्र होता कामा नये. थोडक्यात स्वतःची प्रायव्हेसी जपायची असल्यास कामासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर असावेत. आणि तुम्ही सुज्ञ असाल तर सावधगिरीने सोशल मिडीयाचा वापर करावा.(विषय थोडा भरकटला असला तरी हे सांगणे महत्त्वाचे वाटले.)

५) हटके आणि ''क्रिएटीव्ह रेझ्युमे'' आपली क्रिएटीव्हीटी दर्शवतात. 

     व्हाईट पेपर वर सामान्य रेझ्युमे  तर सगळेच बनवतात पण रंगीत, छायाचित्रे आणि ग्राफिक्स असलेला रेझ्युमे  जरा हटकेच वाटतो नाही का?  सॉफ्टवेअरचे थोडे ज्ञान आणि खूप सारी क्रिएटीव्हीटी यांच्या संगमातून आपण आपला रेझ्युमे  सर्वोत्तम आणि आपल्याला हवा तसा बनवू शकतो. उदा. पत्रकारिता शिकणारा एखाद्या विद्यार्थी उत्तम छायाचित्रकार असेल तर तो त्याचा क्रिएटीव्ह रेझ्युमे "फोटोग्राफी थीम" नुसार बनवू शकतो. एखादा ग्राफिक्स डिझाईनर विविध ग्राफिक्स वापरून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो. "क्रिएटीव्ह रेझ्युमे" हल्लीच्या काळात लोकप्रिय आणि प्रभावी ठरतात.  क्रिएटीव्ह रेझ्युमे चे इंटरनेटवर अनेक नमुने उलपब्ध आहेत."क्रिएटीव्ह रेझ्युमे" बनवण्यासाठी आता  गुगल प्ले स्टोअरवरही काही सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही  मोबाईलवरही "क्रिएटीव्ह रेझ्युमे" बनवू शकता.

६) रेझ्युमेमध्ये  Summery किंवा Career Objective असणं आवश्यक आहे.

     Summery किंवा Career Objective म्हणजे एक असा  पॅराग्राफ कि, ज्यात आपल्या रेझ्युमे मधील सर्व गोष्टी संक्षिप्त पण प्रभावशाली स्वरुपात मांडणे होय. यात आपल्याबद्दल, आपल्या करिअर बद्दल तसेच भविष्यातील आपले ध्येय काय आहे हे सांगावे लागते. कंपनीला हे पटवून द्यावे लागते कि तुम्ही कशाप्रकारे परिपूर्ण आहात. यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास यांनी स्पष्टपणे जाणवला पाहिजे. तुम्ही कोण आहात? तुमच्या क्षेत्रात तुम्ही कसे सुज्ञ आहात?  भविष्यात तुम्हाला कोणत्या पदापार्यात पोहोचायचे आहे? तुमच्यातील गुण आणि ज्ञानाच्या जोरावर तुम्ही कशाप्रकारे स्वतःला घडवणार आहात किंवा घडवले आहे. या सर्व बाबी summery मध्ये असाव्यात. इतरांपेक्षा आपण स्वतःला जास्त ओळखतो त्यामुळे आपणच आपल्याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे लिहू शकतो. यातूनच तुम्चू लेखनशैली, भाषाज्ञान, व्याकरण इत्यादींची ओळख होते. त्यामुळे सर्व स्वतःच लिहावे. जास्तीत जास्त १० ओळी लिहाव्या. निबंध लिहित बसू नये.

७) Declaration ,स्थान, तारीख  आणि स्वाक्षरी.

      रेझ्युमेच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात "I hereby declare that the information furnished above is true to the best of my knowledge.'' अर्थात - वर दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार खरी असल्याचे मी घोषित करते/करतो." हे वाक्य लिहिणे महत्त्वाचे आहे. तसेच एखाद्या कंपनीला  रेझ्युमे देताना किंवा पाठवताना त्या शहराचे नाव  आणि दिनांक लिहिणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात शेवटी स्वतःची सही करणेही आवश्यक आहे.

८) प्रुफ रीडिंग आणि चुका तपासाव्यात.

     संपूर्ण रेझ्युमे तयार झाल्यावर प्रिंट काढून लक्षपूर्वक पुन्हा तपासावा.  व्याकरणातील चुका, फॉंन्ट, स्पेलिंग पुन्हा पुन्हा तपासावे. कारण चुकांमुळे बॅड इंप्रेशन पडते. म्हणून प्रिंट काढून झाल्यावर ३ ते ४ मित्रांकडून तो तपासून घ्यावा. कारण इतरांना आपल्यातील चुका लवकर दिसतात. त्यामुळे तयार झालेला रेझ्युमे  इतरांकडून तपासने फायदेशीर ठरते.

               *********************************************************************
     तर मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार स्वतःला हवा तसा बायोडाटा बनवू शकतो. मीही स्वतःचा बायोडाटा माझ्या परीने चांगला बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. यात मला हवे ते जवळपास सर्व काही आहे. तरीही काही माझ्या त्यात काही त्रुटी असू शकतात. मी माझा बायोडाटा या ब्लॉगवर उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि काही त्रुटी अथवा सजेशन्सअसल्यास नक्की सांगा.

For sample



मला संपर्क साधण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही माध्यमावर  क्लिक करा.





No comments:

Post a Comment

Comments system

[blogger][disqus][facebook]

Disqus Shortname

sigma-2

Post Top Ad

Your Ad Spot