महत्त्वाचे

सध्या माझा ब्लॉग पूर्णपणे तयार नसल्याने बरेच फीचर्स काम करणार नाही. कृपया सहकार्य करावे. - अक्षय बैसाणे

Post Top Ad

Your Ad Spot

visiters

Followers

Wednesday 7 August 2019

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) म्हणजे काय?


जेव्हा तुम्ही ''BMM'' म्हणजेच ''बॅचलर ऑफ मास मिडिया'' या कोर्सची निवड करतात, तेव्हाच तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार करणारे आहात हे सिद्ध होतं.

😃😃😃😃So Say.... We are successful....😃😃😃😃

सौजन्य : झी युवा वाहिनी

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) म्हणजे काय?

     BMM म्हणजेच बॅचलर ऑफ मास मिडिया होय. मुंबई विद्यापीठातील हा कोर्स असून बराच लोकप्रिय कोर्स आहे. पत्रकारिता क्षेत्र, जाहिरात क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक उत्तम पर्याय आहे. या अभ्यासक्रमातही  पत्रकारिता आणि जाहिरात असे दोन भाग पडतात. शेवटच्या वर्षी म्हणजेच BMM  च्या तिसर्या वर्षाला आपणास JOURNALISM(पत्रकारिता)  किंवा ADVERTISING(जाहिरात) यांपैकी एका मुख्य विषयाची निवड करावी लागते. पहिले वर्ष(FYBMM) आणि दुसरे वर्ष(SYBMM) या दोन्ही वर्षांत पत्रकारिता आणि जाहिरात या अभ्यासक्रमांसाठी सारखेच विषय असतात. तिसर्या वर्षी मात्र विषय बदलतात.

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) प्रवेशासाठी पात्रता काय?

     बॅचलर ऑफ मास मिडिया मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२ वी मध्ये कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गासाठी ४५% गुण आवश्यक आहे. 
     सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनही शाखेतील विद्यार्थी BMM मध्ये प्रवेश घेऊ शकतात. कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ५०% जागा राखीव असतात. तर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी २५% - २५% जागा राखीव असतात. 

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) पदवीसाठी कालावधी किती?

   बॅचलर ऑफ मास मिडिया पदवी ही घेण्यासाठी आपणास ०३ वर्षांचा कालावधी लागतो. एका वर्षात ०२ सत्रे(semister) म्हणजेच ०३ वर्षांमध्ये एकूण ०६ सत्रे उत्तीर्ण झाल्यास पदवी मिळते. या तीन वर्षांमध्ये एकूण ३७ विषय शिकवले जातात. त्याचप्रमाणे महाविद्यालयात विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% असणे आवश्यक आहे. तरच तो परीक्षेस बसण्यास पात्र ठरतो.

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) मध्ये कोण - कोणते विषय आहेत?

स्त्रोत : इंटरनेट


बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) पदवी घेतल्यानंतर सेवा संधी कोणत्या?

 मित्रांनो BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर तुम्हाला नोकरीसाठी अनेक क्षेत्र अनेक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे ज्याला पत्रकार व्हायचं आहे त्यानेच BMM शिकावं किंवा BMM शिकणं म्हणजे पत्रकारीतेतच नोकरी करता येते असं काही नाही.  BMM  नंतर विविध क्षेत्रांत नोकरी करता येते. आपल्यातील विविध गुण आणि इच्छाशक्तीवर हे सर्व अवलंबून असते.  उदा. आपणास लेखनाची आवड असेल तर आपण वृत्तसंस्थेत बातमी लेखनाचे काम करू शकतात. संशोधन वृत्ती असेल तर शोध पत्रकारिता करू शकतात. फोटोग्राफी येत असेल तर फोटोग्राफर म्हणून काम करू शकतात. तसेच सिनेमेटोग्राफर, वृत्तनिवेदक, एडिटर, रेडिओ जॉकी, संपादक, प्रतिनिधी, जनसंपर्क अधिकारी असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. 

बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) अधिकृत आणि अद्यवत माहिती कुठे मिळवाल?

  मित्रांनो माझ्या या ब्लॉगवर BMM म्हणजेच बॅचलर ऑफ मास मिडिया बद्दल मी आपणास परिपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. BMM शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी प्रामाणिक आणि शक्य ती मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु तरीही माझ्या ब्लॉगवरील माहिती आपण एकदा तपासून पहावी आणि स्वतः खात्री करून घ्यावी. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आपल्या महाविद्यालयातून आपणास परीक्षेच्या तारखा, निकालाच्या तारखा, नवीन अभ्यासक्रम आणि नियम अशा सर्व गोष्टी मिळतील. त्यासाठी सतत मुंबई विद्यापीठाचा संकेतस्थळाला भेट देत चला. 
         मुंबई विद्यापीठाचा संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  
बॅचलर ऑफ मास मिडिया(BMM) पदवी घेतल्यानंतर सेवा संधी कोणत्या?

     या विषयावर आपण नंतर स्वतंत्रपणे चर्चा करणारच आहोत. कारण हा विषय मोठा असल्याने एका लेखात स्पष्ट करता येणे कठीण आहे. पुढील लेखात आपण BMM मधील बारकावे आणि अभ्यासक्रम तसेच विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. ह्या लेखात BMM ची ओळख करून देणंं एवढाच माझा हेतू होता. तो कितपत पूर्ण झाला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा. आपणास लेख आवडला असल्यास ब्लॉग ला फॉलो आणि शेयर नक्की करा. तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा ब्लॉग नक्की पोहोचवा. 

- धन्यवाद.


No comments:

Post a Comment

Comments system

[blogger][disqus][facebook]

Disqus Shortname

sigma-2

Post Top Ad

Your Ad Spot