महत्त्वाचे

सध्या माझा ब्लॉग पूर्णपणे तयार नसल्याने बरेच फीचर्स काम करणार नाही. कृपया सहकार्य करावे. - अक्षय बैसाणे

Post Top Ad

Your Ad Spot

visiters

Followers

Monday 16 September 2019

कंप्युटर मध्ये फॉन्ट कसे इंस्टॉल करावेत?

     नमस्कार मित्रांनो... वृत्तपत्र आणि मासिक बनवत असताना त्यातील अक्षरांना म्हणजेच टेक्स्ट स्वरूपातील मजकुराला खूप महत्त्व असते. संगणकात टायपिंग करण्यासाठी फॉन्टस् (fonts)वापरले जातात. फॉन्ट वापरूनच सॉफ्टवेअरमध्ये टायपिंग करणे शक्य होते. प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळे फॉन्टस् असतात आणि त्यातही अनेक प्रकार असतात. आपल्या आवश्यकतेनुसार आपण हवा तो फॉन्ट वापरून आपले वृत्तपत्र किंवा मासिक बनवू शकतो. इंग्रजी भाषेत टायपिंग करण्यासाठी संगणकात अगोदरच शेकडो फॉन्टस् उपलब्ध असतात. त्यामुळे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र किंवा मासिक बनवण्यासाठी सहसा वेगळ्या फॉन्टची गरज पडत नाही. परंतु देवनागरी लिपीसाठी किंवा मराठी भाषेसाठी आपल्याला वेगळे फॉन्ट संगणकात इन्स्टॉल करावे लागतात.
     यातूनच मराठी भाषेत आपण टायपिंग करू शकतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेसाठी सुद्धा हजारो फॉन्टस् उपलब्ध आहेत. पण इंटरनेटवर सहज मिळणारे आणि वापरण्यास सोपे असणारे काही फॉन्टस् मी तुम्हाला याठिकाणी उपलब्ध करून देत आहे. हे सर्व फॉन्टस् प्रथम आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या  संगणकात इंस्टॉल करायचे आहे. मी माझे वृत्तपत्र आणि मासिक बनवण्यासाठी मुख्यतः कृतीदेव 010, कृतीदेव 011, कृतीदेव 012, कृतीदेव 040 असे अनेक फॉन्टस्  वापरले आहेत. परंतु आपण आपल्या गरजेनुसार हवे ते फॉन्टस् वापरू शकतात.

आकृतीत दाखवल्याप्रमाणे संगणकाच्या कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन  Fonts या ऑप्शनवर डबल क्लिक करा आणि डाऊनलोड केलेले फॉन्टस् कॉपी करून पेस्ट करा. त्यानंतर मराठी टायपिंग करता येईल.

चला तर मग पाहूयात फॉन्टस्  कसे डाऊनलोड आणि इंस्टॉल  करायचे ते.....

 प्रथम मराठी फॉन्टस् डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानंतर दुसर्‍या टॅबमध्ये  (fonts) नावाचे फोल्डर ओपन होईल. हे फोल्डर अख्खे तसेच्या - तसे डाउनलोड करून घ्या. 435MB(megabites) चे हे फोल्डर असून या एकूण 804 फॉन्टस् आहेत. हे फॉन्टस् (fonts) नावाचे फोल्डर पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर ते फोल्डर ओपन करा त्यानंतर Ctrl+A दाबून किंवा सिलेक्ट ऑल करून सर्व फॉन्टस् सिलेक्ट करून घ्या आणि नंतर राईट क्लिक करून कॉपी(Ctrl+C) करा. आता आपल्या संगणकाच्या कंट्रोल पॅनल मध्ये जा त्याठिकाणी fonts नावाचे ऑप्शन दिसेल. ते फोल्डर ओपन करा आणि पुन्हा हा माऊसचे राईट  क्लिक करा आणि पेस्ट(Ctrl+V) ऑप्शन निवडा. 

"अशाप्रकारे डाऊनलोड केलेले फॉन्टस् तुम्ही कंट्रोल पॅनल मधील फॉन्ट या फोल्डरमध्ये कॉपी करून  इंस्टॉल करू शकता."😊

No comments:

Post a Comment

Comments system

[blogger][disqus][facebook]

Disqus Shortname

sigma-2

Post Top Ad

Your Ad Spot