महत्त्वाचे

सध्या माझा ब्लॉग पूर्णपणे तयार नसल्याने बरेच फीचर्स काम करणार नाही. कृपया सहकार्य करावे. - अक्षय बैसाणे

Post Top Ad

Your Ad Spot

visiters

Followers

Thursday 12 September 2019

वृत्तपत्र आणि मासिक कसे बनवावे? NEWSPAPER & MAGAZINE MAKING(NMM)

     नमस्कार मित्रांनो... "बीएमएम मराठी" या आपल्या हक्काच्या ब्लॉगवर मी अक्षय बैसाणे आपलं हार्दिक स्वागत करतो.  बीएमएम च्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रात म्हणजेच SEM - 5 मध्ये एक प्रकल्प (project) बनवायचा असतो, हे तर सर्वांना माहीत आहेच. NEWSPAPER & MAGAZINE MAKING(NMM) हा विषय पूर्णतः प्रक्टीकॅल असून यात विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी स्वतःची  दोन वृत्तपत्रे (Tabloid size आणि Broadsheet size) तसेच एक मासिक(Magazine) बनवणे गरजेचे आहे. यातूनच विद्यार्थ्याने घेतलेल्या ज्ञानाचा वापर तो किती प्रभावीपणे करू शकतो हे तपासले जाते. 
     प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्याने शिकलेले सर्व गुण त्याला वापरायचे असतात. जसे. बातमीलेखन, एडिटिंग, फोटोशॉप, डीटीपी, सर्जनशीलता, नव्या - नव्या युक्त्या,  लेख - अग्रलेख, कविता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, क्रिएटिव्हपणा, मेहनत,  इत्यादी त्याचे सर्व गुण त्याने स्वतः बनवलेल्या त्याच्या वृत्तपत्र आणि मासिकातून दिसून येतात. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे वृत्तपत्र आणि मासिक  स्वतःच प्रामाणिकपणे तयार करावे असा विद्यापीठाचा हेतू आहे.
     जे विद्यार्थी FY आणि SY मध्ये शिकत असताना अभ्यासासोबतच एखाद्या वृत्तसंस्थेत काम अथवा इंटर्नशिप करत असतात त्यांना त्यांच्या मेहनतीचा येथे नक्कीच फायदा होतो. कारण त्यांनी स्वतः कव्हर केलेल्या बातम्या, लिहिलेले लेख ते याठिकाणी वापरू शकतात. त्यांना माहीत गोळा करण्याची अथवा कॉपी - पेस्ट करण्याची जास्त गरज पडत नाही. आणि खरंतर हा प्रोजेक्ट असाच बनवायला हवा. तसेच वृत्तपत्र आणि मासिक यातील जाहिराती यादेखील स्वतःच्या असल्या तर उत्तमच. शक्यतो या विषयात "तांत्रिक बाबी" जास्त विचारात घेतल्या जातात. म्हणजे सॉफ्टवेअर चे ज्ञान आणि कौशल्य हेच शक्यतो तपासले जाते. त्यामुळे कंटेंट जुना असो किंवा नवीन, स्वतःचा असो किंवा कॉपी केलेला असो याने जास्त फरक पडत नाही. वृत्तपत्राची आणि मासिकाची मांडणी, बारकावे, सॉफ्टवेअर मधील विविध टूल्स यावरूनच परीक्षण केले जाते. पण आपले स्वतःचे कंटेंट असले की उत्तमच... नाही का?...

अशाप्रकारे एक Tabloid size वृत्तपत्र , एक  Broadsheet size वृत्तपत्र आणि एक मासिक (magazine)  प्रिंट करून त्यांची Softcopy  DVD मध्ये  जमा  करावी लागते.


     तर या लेखात Tabloid size आणि Broadsheet size वृत्तपत्र यांतील फरक, वृत्तपत्राचे स्वरूप, बातम्या तसेच  जाहिरातींचे स्त्रोत आणि त्यासाठी कोण - कोणती सॉफ्टवेअर्स वापरावीत, वृत्तपत्र आणि मासिक बनवण्यासाठी माहिती(content) आणि जाहिराती(advertisement)कशा मिळवाव्यात? यांसह अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या लेखातून करणार आहे. तेव्हा हा लेख संपूर्ण वाचा. या लेखाचा आपल्याला उपयोग झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. लेख आणि ब्लॉग आवडल्यास फॉलो आणि शेयर करायला विसरु नका... चला तर मग सुरू करूयात....

१) Tabloid size आणि Broadsheet size यामध्ये काय फरक आहे?






Tabloid size म्हणजे थोडक्यात छोट्या आकाराची वृत्तपत्रे होय. ११ × १७  इंच या आकाराची Tabloid वृत्तपत्रे असतात. प्रत्येक देशात वृत्तपत्रांचे आकार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे  ठराविक आकरालाच  Tabloid size आणि Broadsheet size  म्हणता येणार नाही. एकूणच लहान आकाराची वृत्तपत्रे म्हणजेच   Tabloid size वृत्तपत्र होय.

उदाहरणार्थ: मुंबई चौफेर, दोपहर का सामना, मुंबई मिरर इत्यादी.










Broadsheet size म्हणजे मोठ्या आकाराची वृत्तपत्र होय मोठ्या आकाराची वृत्तपत्रे होय. २९.५ × २३.५ इंच या आकाराची Broadsheet size वृत्तपत्रे असतात. Tabloid पेक्षा आकाराने मोठे असतात.
उदाहरणार्थ: लोकमत, लोकसत्ता, पुढारी, पुण्यनगरी, नवाकाळ इत्यादी.





२) वृत्तपत्र किती पानांचे असावे? त्याचे स्वरूप कसे असावे?

 बी. एम. एम. च्या या प्रकल्पासाठी वृत्तपत्र हे कमीत कमी चार ते सहा पानांचे असावे. चार पानांचे पुढे आणि मागे असे मिळून आठ पाने होतात. वृत्तपत्र हे रंगीत असावे.





वृत्तपत्राचे स्वरूप:  Tabloid size आणि Broadsheet size ही दोन्ही वृत्तपत्रे इतर वृत्तपत्राप्रमाणेच असावी. म्हणजे पहिल्या पानावर मुख्य बातमी, दुसऱ्या पानावर शहर किंवा जिल्ह्याची बातमी त्यानंतर मनोरंजनासाठी वेगळे पान, क्रीडा आणि विश्व यासाठी वेगळे पान, तसेच संपादकीय इत्यादी सर्व गोष्टी दोन्ही वृत्तपत्रांमध्ये असाव्यात. तरच ते वृत्तपत्र परिपूर्ण समजले जाते. त्याचप्रमाणे वृत्तपत्राचे नाव, किंमत, एकूण पाने,त्याचा उल्लेख वृत्तपत्र मध्ये असलेल्या जाहिराती, लेख, कविता,वापरलेले फोटो किंवा ग्राफिक्स या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात.






३) वृत्तपत्रासाठी बातम्या कुठून मिळवाव्यात?

 ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्षात  शिकत असताना एखाद्या वृत्तसंस्थेत काम अथवा इंटर्नशिप केली असेल तर त्यांना याबाबत काही अडचण येणार नाही. त्यांनी स्वतः कव्हर केलेल्या बातम्या ते स्वतःच्या वृत्तपत्रात टाकू शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वृत्त संस्थेत काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही ही अशा विद्यार्थ्यांना आपला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इतर वृत्तपत्रातील बातम्या वापराव्या लागतील.  त्यासाठी विविध मराठी वृत्तपत्रे अथवा वेब पोर्टल्स आणि आणि ई-पेपर्स यांचा आधार घ्यावा लागेल. लोकमत, लोकसत्ता, पुढारी, पुण्यनगरी, नवाकाळ, प्रहार, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स अशी अनेक मराठी वृत्तपत्रे आणि त्यांची वेब पोर्टल यातून मराठी बातम्या टेक्स्ट स्वरूपात मिळतील. तसेच स्वतःही टाईप करू शकता. बातम्यांमध्ये देश-विदेश, जिल्हा, शहर, तालुका, गाव, राजकारण,समाजकारण, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, अशा सर्व प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात असणे अपेक्षित असते.

४) वृत्तपत्रासाठी आणि मासिकासाठी जाहिराती कुठून मिळाव्यात?



प्रकल्पातील वृत्तपत्रासाठी जाहिराती मिळवणे काही कठीण काम नाही. आपल्या मित्र परिवारापैकी किंवा आपल्या परिसरातील एखादे दुकान, कोचिंग क्लास, ब्यूटी पार्लर, लघु उद्योग,खानावळ किंवा घरगुती व्यवसाय अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील मुख्य व्यक्तीला विचारून माफक दरात अथवा मोफत त्यांची जाहिरात आपण आपल्या वृत्तपत्र आणि मासिक यांमध्ये टाकू शकतो. परंतु एक जाहिरात एकदाच वापरावी आणि एकाच वृत्तपत्र अथवा मासिकात वापरावे पुन्हा - पुन्हा तीच जाहिरात वापरू नये.

५) वृत्तपत्र आणि मासिक बनवण्यासाठी कोण-कोणते सॉफ्टवेअर्स वापरावेत?

वृत्तपत्र आणि मासिक बनवण्यासाठी शेकडो सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत पण विद्यार्थ्यांसाठी परवडणारे सहज आणि सोपी सॉफ्टवेअर म्हणजे Quark Xpress, InDesign, Photoshop, Coral draw ही आहेत आणि हे सहज उपलब्ध होतात. शक्यतो क्वार्क एक्सप्रेस यातूनच वृत्तपत्र आणि मासिक बनवावे. गरज पडल्यास कव्हर पेज साठी फोटोशॉपचा वापर करावा फोटोशॉप मध्ये क्वार्क एक्सप्रेसच्या तुलनेत एडिटिंग साठी जास्त सुविधा आहेत. परंतु वृत्तपत्र आणि मासिक बनवण्यासाठी कॉलम हेडिंग असे अनेक सुविधा  क्वार्क एक्सप्रेस मध्ये असल्याने ते वापरणे सोयीस्कर पडते.






                             

तर मित्रांनो आशा करतो कि या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला वृत्तपत्र आणि मासिक कसे बनवावे? त्यासाठी बातम्या, जाहिराती कशा मिळवाव्यात? कोण - कोणती सॉफ्टवेअर्स वापरावीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. पुढील पोस्ट मध्ये आपण सॉफ्टवेअर्स मधील विविध टूल्स आणि इतर तांत्रिक माहिती जाणून घेणार आहोत. या पोस्टबद्दल काही प्रश्न अथवा सूचना असल्यास कमेंट करून नक्की सांगा.
- धन्यवाद.



No comments:

Post a Comment

Comments system

[blogger][disqus][facebook]

Disqus Shortname

sigma-2

Post Top Ad

Your Ad Spot